केशराच्या देशात भाग ६

    24-Jul-2017   
Total Views | 4
 
पर्यावरणस्नेही शहराची धडपड
 
एखादं शहर किती सुंदर, शांत, स्वच्छ असू शकते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव या लेखात मिळतो. माद्रिद हे असेच एक उत्तम वातावरण, स्वच्छ शहर. इथे पर्यावरणाला त्रास होणार नाही म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. अशा मस्त शहराची भटकंती या लेखाद्वारे नक्की होईल. 


 
माद्रिद हे सुंदर-शांत-स्वच्छ आणि टवटवीत व्हावं, यासाठी बरेच उपक्रम हाती घेतलेले दिसले. मुळात माद्रिद उंच कोरड्या पठारावर स्थित असल्यामुळे इथे वातावरणात कमालीचा चढउतार असतो. थंडीत खूप थंडी उन्हाळ्यात रणरणता उकाडा. भविष्यात हे आणखीनच वाढेल, असं वर्तवलं जातं. एवढेच काय तर पावसाचे प्रमाण २५% कमी होईल. माद्रिदचा ऊर्जा आणि वातावरण बदल विभाग यावर गांभीर्याने विचार करतोय. डिझेल गाड्यांवर बंदी, अनेक ठिकाणी गाड्यांवर बंदी असे नियम पाळले जात आहेत. यावर महत्त्वाचं म्हणजे हरितीकरण हा उपाय आहे. वृक्षलागवड, बागा आणि भिंतीवर बागा. आपल्याकडे हल्ली व्हर्टिकल गार्डन्स दिसतात तसे नव्हे तर चक्क भिंतीवर, छतांवर बागा. त्यामुळे शहरात उत्सर्जित होणारी उष्णता कमी होऊन गारवा येईल. ठिकठिकाणी मोकळ्या जागांवर वृक्षलागवड केली जात आहे. ज्या ठिकाणी लाद्या, दगडी फरसबंदी होती ती उखडून जागा केल्या आहेत. जेणेकरून पर्जन्यजल जमिनीत मुरेल. नदी किनार्‍यांवरही वृक्षलागवड केली जात आहे. या सगळ्या प्रकारामुळे उष्णता कमी होईल. उष्णतेचं उत्सर्जन कमी होऊन इतरही फायदे होतील, ऊर्जा वाचेल. वाहनांचा आवाज कमी होईल. शहर ग्लोबल वार्मिंगला सामोरे जायला सज्ज होत आहे. शहरामध्ये फिरताना पर्यावरणस्नेही उपक्रम आम्हाला अनेक ठिकाणी दिसत होते.
 

 
माद्रिदहून सीरियाला जायला आम्ही इथली हाय स्पीड ट्रेन ऍव्रे घेतली. गाडी पकडायला माद्रिद अटोचा या स्थानकावर गेलो. हे स्थानक अगदी थक्क करणारे आहे. स्थानकात एक भलंमोठं बोटॅनिकल गार्डन आहे. स्थानकाच्या काचेच्या छतांच्या आत चार हजार चौरस मीटरची बाग. १८५१ साली बांधलेल्या या स्थानकाला आग लागून बरंच नुकसान झालं होतं. मग बर्‍याचदा नूतनीकरण झाले. १९९२ ला बरेच बदल झाले आणि ही बाग बनविण्यात आली. स्थानकावर ही बाग, त्याभोवती बसायला जागा, आजूबाजूला दुकानं, कॅफे, नाईट क्लब आणि हॉटेल्स. हे स्थानक एक वेगळाच अनुभव होता. या बागेत २६० प्रजातींची ७००० हून जास्त झाडं आहेत. यातली बरीच झाडं छतापर्यंत पोहोचली आहेत. शिवाय एका बाजूला एक तळेही आहे. त्यात २२ प्रजातींचे मासे आणि कासवं आहेत. इथे अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडातल्या वनस्पती आहेत. उन्हाळ्यात माद्रिद मध्ये उन्हाळा जेव्हा तापतो तेव्हा इथे वातावरण नियंत्रित ठेवायला असंख्य तुषार सिंचनाचे कारंजे सुरू होतात, तेही अगदी जंगलच दिसत असावं.
 

 
स्पेन हा प्रगत देश आहे. सार्वजनिक वाहतूक, उत्तम रस्ते सगळं काही उत्तम. त्यामुळे लोक ट्रेन, बस, स्वत:ची कार अगदी सायकलीचाही वापर करतात. त्यामुळे झालंय काय, लोकांनी चालणंच बंद केलंय. एका संस्थेने यावर संशोधन केलं आणि असं कळलं की, माद्रिदचे लोक दिवसातून पंधरा मिनिटंदेखील चालत नाही आणि त्याहूनही वाईट म्हणजे अर्ध्याहून अधिक जनता स्थूलतेकडे वळली आहे. मग कारणं शोधायला सुरुवात झाली. पूर्वी लोक चालायचे. आता का नाही? १९६० ते १९८० च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पुनर्विकास आणि आधुनिकीकरणाचे काम सुरू झाले. त्यात मोटारगाड्यांना प्राधान्य देण्यात आले. काही वेळा रस्त्याच्या कडेला जुने-मोठे वृक्ष काढून टाकण्यात आले, कारण त्यामुळे रस्त्याला धोका निर्माण होण्याची भीती होती. रस्त्यांच्या दुतर्फा कॅफे, बार आले. त्यामुळे बसायची सोय राहिली नाही. आता लोकांना चालण्यासाठी प्रवृत्त करायला बरेच उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्याला एक जेट क्यू कॅमिना म्हणजे चालणारी माणसं म्हणजे सायकलीसाठी जसा मार्ग आहे तसा चालणार्‍यांसाठी वेगळा मार्ग. लोक चालले तर आरोग्य सुधारेल, लोक शेजार-पाजार्‍यांना भेटतील. बर्‍याच ठिकाणी वृक्षलागवड केली जात आहे, जेणेकरून वृक्षांच्या सावलीत लोक चालत जातील. बर्‍याच ठिकाणी मोटारगाड्यांना प्रवेश बंद आहे. जॉगिंग आणि सायकलिंग जसे आरोग्यासाठी चांगलं तसंच चालणंदेखील आहे, असं लोकांना पटवायचं काम चालू आहे !
 

 
स्पेनमध्ये सगळीकडे सायकलींसाठी एक नियोजित मार्ग दिलेला आहे. एक सायकलप्रेमी म्हणून मला तो खूप भावला. सीरियातही मुख्य रस्त्याच्या कडेला सायकलचा मार्ग असल्यामुळे सायकलस्वार सुरक्षित आणि भरधाव वाहनांना त्यांचा त्रास नाही. माद्रिदमध्ये बिसिमॅड इलेक्ट्रिक सायकल बार्सिलोनाची बायसिंग या कारचा वापर कमी व्हावा, धूर कमी व्हावा या उद्देशाने सुरू केलेल्या कंपन्या. अनेक ठिकाणी सायकल स्टँड असतात. लोक ज्या कंपनीच्या सायकली वापरतात त्याची चावी त्यांना मिळते. मग कोणत्याही ठिकाणी जायचं असेल तर सायकल घ्यायची आणि जवळपासच्या स्टँडवर सायकल पार्क करायची, इतकं सोयीचं आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास केल्यावर अंतर्गत प्रवासासाठी लोकांना सायकल हा उत्तम पर्याय आहे. पर्यटकांसाठीही ’सायकल टूर्स’ आयोजित केल्या जातात, ज्या भयंकर लोकप्रिय आहेत. 
 
- अंजना देवस्थळे

अंजना देवस्थळे

लेखिका एमएससी इन हॉर्टिकल्चर असून पेशाने हॉर्टिकल्चर कन्स्लटंट आहेत. हॉर्टिक्लचर अर्थात ‘उद्यानविद्या’ क्षेत्रात त्या अध्यापन करतात, शिवाय या विषयातील तज्ज्ञ सल्लागार म्हणूनही त्या कार्यरत असून विपुल लेखनही करतात. ‘पर्यावरण दक्षता मंच’च्या त्या कार्यकर्ता असून पर्यावरणीय विषयांचा व्यापक अभ्यास आहे

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121