पहा 'मुक्काबाझ' ट्रेलर : विनीत कुमार सिंगला वासेपूर नंतर प्रथमच मोठी संधी!

    09-Dec-2017
Total Views |

 
गँग्स ऑफ वासेपूर भाग १ आणि भाग २ हे चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीतील मोलाचे घटक बनले आहेत. आज बऱ्याच रसिकांना या चित्रपटातील संवादही तोंड पाठ आहेत. गँग्स ऑफ वासेपूर म्हणालं की सरदार खान (मनोज बाजपेयी) व फैझल (नवाझुद्दीन सिद्दीकी) डोळ्यासमोर उभे राहतात. पण या चित्रपटाने आपल्याला इतरही अनेक उमदे कलाकार दिले, यापैकी एक म्हणजे विनीत कुमार सिंग. दानिश फैझलचा मोठा भाऊ अशी त्याची या चित्रपटात ओळख होती. त्याला खूप मोठा रोल यामध्ये मिळाला नाही पण जेवढं काम करण्याची संधी मिळाली त्याचं त्यांनी सोनं करून दाखवलं. आता याच विनीत कुमार सिंगल अनुराग कश्यपने मोठी संधी दिली असून 'मुक्काबाझ' या चित्रपटातून तो उत्तरप्रदेशचा माईक टायसन म्हणजेच रावडी बॉक्सरच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.
 
 
 
'मुक्काबाझ' या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच झाला आणि सर्वत्र विनीत कुमारच्या कामाची चर्चा होऊ लागली. अनुराग कश्यपचा चित्रपट असल्याने तो उत्तर प्रदेशच्या बॅकड्रॉपवर असणार हा आता जवळपास मापदंडच झाला आहे. तसचं 'मुक्काबाझ'ची कथा उत्तर प्रदेशच्या बरेली गावात घडणारी आहे. ब्राम्हण कुटुंबातील मुलगी आणि खालच्या जातीतील मुलगा म्हणजे 'ऑनर किलिंग'चा या चित्रपटाचा मूळ विषय आहे, मग त्याभोवती बॉक्सर, राजकारण, खेळ अशा गोष्टी गुंफण्यात आल्या आहेत. विनीत कुमारने या चित्रपटात श्रवण सिंगची व्यक्तिरेखा साकारली आहे. वासेपूरनंतर विनीतच्या वाट्याला 'अग्ली', 'बॉम्बे टॉकीज' हे चित्रपट आले खरे, पण त्यात त्याला प्रमुख भूमिका मिळाल्या नाहीत. त्यातही 'अग्ली'मधल्या त्याच्या कामाचे कौतुक झाले व त्याला सहकलाकार म्हणून पुरस्कारही मिळाला.
 
 
 
'मुक्काबाझ'चा ट्रेलर येण्यापूर्वी 'पैंतरा' नावाचं याच चित्रपटातील गाणं प्रसिद्ध झालं होतं. या गाण्यांनी सोशल मीडियावर प्रचंड हवा केली व त्यामुळेच ट्रेलरची उत्सुकता लागून राहिली होती. अल्पावधीतच ट्रेलरलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची मूळ कथाही विनीतनेच लिहिली आहे. विनीत कुमार बरोबरच या चित्रपटात जेमी शेरगील, रवी किशन हे अनुभवी कलाकार दिसतील, झोया हुसेन हा नवा चेहराही या चित्रपटातून दिसणार आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित व आनंद राय निर्मित 'मुक्काबाझ' हा चित्रपट १२ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होत आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121