#ओवी लाईव्ह..The City Never Sleeps

    28-Aug-2016   
Total Views | 2

"जाम कंटाळा आलाय यार! १८-२० तास काम करून डोक पकलय. अंग दुखतंय. आणि काही म्हणजे काही डोक्यात जात नाहीय."

"कशासाठी इतकं काम करतोस? Take it easy ना!"

"मला ४०व्या वर्षी retire व्हायचे आहे. मग आत्ता कष्ट घ्यायलाच लागतील ना!"

अघोरी काम करून, भरपूर पैसे मिळवून ४०व्या वर्षी retire होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पिढीतला स्वप्नील. अक्षय त्याच्या मित्राकडे काळजीने पाहत होता. व्यायामाला वेळ नाही. विरंगुळ्याला वेळ नाही. वजन वाढलय. Sugar वाढलीय. Cholesterol वाढलंय. सतत मरगळलेला दिसतो. घरचे ह्याच्या सततच्या व्यग्रतेने कावलेले. मुला बरोबर खेळायला वेळ नाही. की बायको बरोबर फिरायला वेळ नाही. आई-वडिलांना बरोबर गप्पा मारायला वेळ नाही. काय म्हणायचं अशा जगण्याला?

अक्षय म्हणाला, "मित्रा! अरे तू काय मिळवतोयस आणि त्यासाठी काय काय गमवतोयस याचा कधी विचार केलास का? आणि retire होऊन करणार काय? आराम!? तो तर आत्ता पण थोडा थोडा केलास तर retire होण्याची गरजच पडणार नाही. ८०व्या वर्षा पर्यंत efficiently काम करू शकशील!"

 


If we could give every individual the right amount of nourishment and exercise, not too little and not too much, we would have found the safest way to health. – Hippocrates, 400 BCE

गीता सांगते - उत्तम आरोग्य कमवून, उत्तम काम करून, समृद्ध व आनंददायी आयुष्य जगण्याचे स्वप्न उराशी बांध. १०० वर्षे कार्यरत राहून, समाजोपयोगी जीवन जगण्याचे ध्येय बाळग. त्यासाठी - योग्य प्रमाणात व योग्य प्रकारचा - आहार, व्यायाम, झोप, कष्ट व कर्म कर.

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।

युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा । ६.१७ ।।

 

-दिपाली पाटवदकर 


 

दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121