#ओवी Live- मेंटॉर

    14-Aug-2016   
Total Views | 1

मेंटॉर

--------------------

शेजारचा  निनाद  दादा  जे  करेल  तेच  अमेय  करायचा.  अमेयला  "copy-cat"  म्हणालं  तरी  त्याला त्याचं  काही  वाटायचं  नाही. 

निनाद  अभ्यास  करतांना  दिसला  की  हा  पण  अभ्यासाचे  पुस्तक  घेऊन  बसायचा.  निनादची  encyclopedia,  atlas  चाळत  बसायची  सवय  अमेयला  बेमालूम  लागली.  निनाद  दादा  खूप  अभ्यास  करायचा,  खेळायचा,  भरभरून  बोलायचा.  त्या  सगळ्या  गोष्टी  कळत-नकळत  अमेयने  आत्मसात  केल्या.  कॉलेजला  गेल्यावर  निनादने भांग बदलला,  की  अमेयचा  पण  भांग  बदलला! 

निनादने  B.Tech  झाल्यावर  आता  एक  start-up  सुरु  केली  आहे.  अमेयने  निनाद  जायचा  त्याच  कॉलेजला  ११  वी  साठी  admission  घेतली,  तेच  classes  लावले!  निनाद  सारखंच  त्याला  B.Techकरायचंआहे. 

अगदी असंच मामी आजी कडून स्वयंपाक शिकली. तिला  "लोणचे वर्षभर कसे टिकवायचे",  किंवा  "पुरणाच्या पोळीची कणिक किती सैल मळायची"  वगैरे  experiments  न करता,  trial  &  error शिवाय,  पहिल्या पासूनच चांगला स्वयंपाक यायला लागला!


ज्ञानेश्वर  म्हणतात  -  एखादी  गोष्ट  मुळापासून  शिकून,  त्याविषयी  सर्व  वाचून,अभ्यासकरून नंतर  implement  करणे,  अशक्य  आहे.  त्या  करिता  त्या क्षेत्रातील एकआदर्श  व्यक्ती  शोधा.  आणि  त्याच्या  प्रमाणे  अनुकरण  करा. 

दगडावर दगड घासून, अग्नी  निर्माण  करून,  दिवा  लावण्यापेक्षा  दिव्यावर  दिवा  लावणे  सोयीचे  आहे.  तलाव  बांधून  पाणी  पिण्यापेक्षा  ज्याने  तलाव  बांधला  आहे  त्याचे  कडून  पाणी  पिणे  जसे  सोपे  आहे,  तसे सज्जनांचे   अनुकरण  केले  असता  त्याला  जे  फळ  मिळाले  तेच  फळ  विनासायास  आपल्या  पदरी  पडते.

-दिपाली पाटवदकर


दीपाली पाटवदकर

संतसाहित्य, खगोलशास्त्र, भूमिती, इतिहास व चित्रकला या सर्वाचा मिलाफ त्यांच्या लिखाणात आहे. ‘चित्र ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवरचे चित्रमय पुस्तक, 'नक्षत्रांची फुले' हे आकाशाच्या गोष्टींचे पुस्तक प्रकाशित. त्यांनी काढलेल्या ज्ञानेश्वरी व आकाशाच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. त्यांची चित्रे व पुस्तके www.facebook.com/kalaapushpa पाहायला मिळतील.

अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121