श्रावण म्हणजे मराठी सणांची चाहूल! भक्ती, आनंद आणि परंपरेचा उत्सव, जाणून घ्या या महिन्यातील '५' मुख्य सण!

मंगळागौरी पूजन

श्रावणातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिला मंगळागौरीची पूजा करतात. पारंपरिक खेळ, पूजा आणि रात्रीचे जागरण हे या सणाचे खास आकर्षण असते.

नारळी पूर्णिमा

सागरी संस्कृती आणि कोळी बांधवांचा हा सर्वात महत्त्वाचा सण. समुद्राला शांत ठेवून सुरक्षिततेसाठी रेशमी धागा बांधलेला नारळ अर्पण केला जातो.

रक्षाबंधन (राखी पौर्णिमा)

श्रावण पूर्णिमेला बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा उत्सव साजरा होतो. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो.

गोकुळाष्टमी व दहीहंडी

श्रावण वद्य अष्टमीला बाळकृष्णाचा जन्मदिवस उत्साहात साजरा होतो. आणि दुसऱ्या दिवशी 'गोविंदा आला रे'च्या गजरात दहीहंडीचा रोमहर्षक उत्सव रंगतो.

पिठोरी अमावस्या

श्रावण महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावस्येला 'पिठोरी अमावस्या' किंवा 'श्रावणी अमावस्या' म्हणतात. या दिवसापासून श्रावण महिन्याची सांगता होते आणि भाद्रपद महिन्याची चाहूल लागते.