बॉलिवूडच्या 'मसाला'पटांपेक्षा वेगळं काही पाहायचंय? मग भारतीय पॅरेलल सिनेमांच्या या दिग्दर्शकांचे चित्रपट प्रत्येकाने एकदा तरी पाहिलेच पाहिजेत!

सत्यजित रे

ज्यांनी भारतीय चित्रपटाला खऱ्या अर्थाने ऑस्कर आणि जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांचे चित्रपट म्हणजे मानवी भावनांचा आरसा! चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरीबद्दल इ.स. १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. नक्की पहा: पाथेर पांचाली, चारुलता, अपराजितो

श्याम बेनेगल

ग्रामीण भारत, तिथला संघर्ष आणि माणसांच्या मनात चालणारी घालमेल त्यांनी अगदी सहज आणि वास्तववादी पद्धतीने पडद्यावर आणली. त्यांच्या या कार्यासाठी त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले ज्यात १८ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेर पुरस्कार व एक नंदी पुरस्कार आहे. नक्की पहा: अंकुर, मंथन

मृणाल सेन

चित्रपटांचे जुने नियम बाजूला ठेवून, समाजातील कडू सत्य आणि मध्यमवर्गीयांचे प्रश्न मांडण्याची त्यांच्यात धाडसी शैली होती. त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजले जात होते. नक्की पहा: भुवन शोमे, मृगया

अदूर गोपालकृष्णन

दक्षिण भारतातील या महान दिग्दर्शकाचे चित्रपट शांत असतात, पण ते पाहताना तुमच्या डोक्यात अनेक विचारांची चक्रं सुरू होतात. यांची कारकीर्द काही अशी आहे की, ते राष्ट्रीय पारितोषिकाचे ९ वेळा विजेते ठरले असून भारतातील चित्रपटक्षेत्रातील सर्वांत मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना २००४ साली गौरवण्यात आले आहे. नक्की पहा: स्वयंवरम, एलिप्पथायम

डॉ. जब्बार पटेल

मराठी सिनेमाला नवे वळण देणारे दिग्दर्शक! राजकीय ताणाताणी आणि सामाजिक प्रश्न मांडण्यात त्यांचा कोणीही हात धरू शकत नाही. नक्की पहा: सिंहासन, सामना, उंबरठा, जैत रे जैत

चैतन्य ताम्हाणे

वास्तववादी सामाजिक निरीक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव रोशन करणारा दिग्दर्शक. ते त्यांच्या चित्रपटात कोणतीही नाट्यमयता न आणता भारतीय न्यायव्यवस्था आणि कलेचा प्रवास अत्यंत बारकाईने दाखवतात. नक्की पहा: कोर्ट, द डिसायपल

नीरज घायवान

जातीव्यवस्था, मानवी दुःखाची वेदना आणि सामाजिक भेदभावाचे अत्यंत संवेदनशील चित्रण. कोणतीही ओढून-ताणून आणलेली सहानुभूती न दाखवता, माणसाच्या अगतिकतेला आणि संघर्षाला सन्मान देणारी शैली. नक्की पहा: मसान, गीली पुच्छी