फोन पाण्यात भिजल्यास तो बंद झाला असेल, तर तो चालू (Switch On) करण्याची घाई करू नका. जर फोन चालू असेल, तर तो त्वरित बंद करा. ओल्या फोनमध्ये शॉर्ट-सर्किट होण्याचा धोका सर्वात जास्त असतो.
फोन सुकवण्यासाठी बऱ्याचदा लोक हेअर ड्रायर वापरतात. पण ड्रायरच्या गरम हवेमुळे फोनमधील नाजूक प्लास्टिकचे पार्ट्स वितळू शकतात आणि हवेच्या प्रेशरमुळे पाणी आत अधिक खोलवर जाऊ शकते.
भिजलेला फोन नीट सुकण्यापूर्वी अजिबात चार्ज करू नका. चार्जिंग पोर्टमध्ये ओलावा असल्यास बॅटरी ब्लास्ट होऊ शकते किंवा फोनचा मदरबोर्ड पूर्णपणे जळून खाक होऊ शकतो.
तांदूळ पाणी शोषून घेतो हा जुना समज आहे, पण तांदळाचे बारीक कण आणि स्टार्च पावडर फोनच्या हेडफोन जॅक किंवा चार्जिंग पोर्टमध्ये अडकून फोन अधिक खराब करू शकतात. त्याऐवजी 'सिलिका जेल' (Silica Gel) पाकिटांचा वापर करा.
पाणी बाहेर काढण्याच्या नादात फोन जोरात झटकल्याने किंवा चार्जिंग पोर्टमध्ये फुंकर मारल्याने, बाहेर असलेले पाणी फोनच्या आत मुख्य भागांपर्यंत (उदा. स्क्रीन आणि मदरबोर्ड) पोहोचू शकते.
१) फोन सुती कपड्याने पुसून घ्या. २) सिम कार्ड आणि मेमरी कार्ड बाहेर काढा. ३) फोन पंख्याखाली किंवा सिलिका जेलच्या पाकिटांसोबत कोरड्या जागी २४ तास ठेवा.