महाराष्ट्र ठप्प! मुंबई-पुणे मार्ग बंद, रेड अलर्ट कायम

सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार; पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे! कुठे काय परिस्थिती?

हवामान विभागाचा 'रेड अलर्ट'

मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणासह अनेक भागांत अतिवृष्टीचा तडाखा. पुढील २४ तास धोक्याचे असून काही ठिकाणी ताशी ७० ते ८० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा!

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळली!

मिसिंग लिंक परिसरात मोठी दरड कोसळल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प. अनेक आमदारही रस्त्यात अडकल्याने त्यांना पुण्यात परतावे लागले.

एसटी बस सेवा अनिश्चित काळासाठी बंद

दरड कोसळल्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद. उर्से टोलनाक्यावर अडकलेल्या बसेस सुरक्षितपणे मागे फिरवल्या.

विधिमंडळाचे कामकाज स्थगित!

मुंबईतील अतिवृष्टी आणि आमदारांना येण्यास झालेल्या अडचणींमुळे राज्य विधिमंडळाचे आजचे कामकाज पूर्णपणे स्थगित करण्यात आले आहे.

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले, झाडे उन्मळून पडली

काळाचौकीतील आंबेवाडीसह अनेक ठिकाणी झाडे कोसळून वाहनांचे नुकसान. सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकरांचा खोळंबा.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन: 'घराबाहेर पडू नका'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन घेतला आढावा. "प्रशासन अलर्ट मोडवर आहे, अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये," असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.