पावसाळ्यात जागोजागी पाणी साचल्याने डासांची पैदास वाढते. यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा धोका निर्माण होतो. लक्षणे: तीव्र ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि अंगावर रॅशेस येणे.
घराभोवती टायर, कुलर किंवा कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. झोपताना मच्छरदाणी किंवा मॉस्किटो रिपेलेंटचा वापर करा. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
पावसाळ्यात जलवाहिन्या दूषित झाल्याने गॅस्ट्रो, टायफॉईड, डायरिया आणि कावीळ (Hepatitis A) सारखे पोटाचे विकार बळावतात. लक्षणे: उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि तीव्र ताप.
पाणी नेहमी उकळून आणि गाळूनच प्या. उघड्यावरील, रस्त्या कडेचे खाणे आणि शिळे अन्न पूर्णपणे टाळा. जेवण्यापूर्वी आणि बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा.
पावसाच्या साचलेल्या पाण्यात उंदीर किंवा जनावरांच्या लघवीतील जंतू मिसळतात. या दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यास लेप्टो होऊ शकतो. उपाय: साचलेल्या पाण्यातून चालणे टाळा. पायाला जखम असल्यास पाण्यात अजिबात जाऊ नका. पाय स्वच्छ धुवून जंतुनाशक लावा.
पावसाळ्यात कोणताही ताप अंगावर काढू नका. लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.