पावसाळी ट्रेकमध्ये भिजण्यापासून स्वतःचा बचाव करणे सर्वात महत्त्वाचे असते. चांगल्या क्वालिटीचा रेनकोट किंवा पॉन्चो सोबत ठेवा, जेणेकरून थंडी वाजणार नाही आणि ट्रेक करणे सोपे जाईल.
तुमचे कपडे, पाकीट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी सॅकला रेन कव्हर लावा. मोबाईल आणि महत्त्वाचे कागदपत्र झिपलॉक (Ziplock) बॅगमध्येच ठेवा.
पावसाळ्यात वाटा निसरड्या होतात. त्यामुळे साधे शूज किंवा चपला घालणे टाळा. मजबूत ग्रीप असणारे ट्रेकिंग शूजच वापरा, जे घसरण्यापासून तुमचा बचाव करतील.
बॅगेत बँड-एड, अँटीसेप्टिक क्रीम, पेन किलर आणि ओआरएस पावडर नक्की ठेवा. तसेच, पावसाळ्यात पळस किंवा जळू (Leeches) लागतात, त्यांच्यासाठी सोबत 'मीठ' किंवा 'हळद' ठेवणे फायदेशीर ठरते.
ट्रेकिंग करताना सतत ऊर्जा मिळण्यासाठी सोबत खजूर, ड्राय फ्रूट्स, चिक्की किंवा एनर्जी बार ठेवा. डिहायड्रेशन टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी सोबत ठेवा.