एप्रिकॉट ब्लॉसम फेस्टिवल
लडाखमध्ये वसंत ऋतूच्या स्वागतासाठी 'एप्रिकॉट ब्लॉसम फेस्टिवल’ साजरा केला जातो.
एप्रिल महिन्यात लडाखमधील खुबानी (चुली) झाडांना पांढरी आणि गुलाबी रंगांची फुले येतात. या फुलांनी लडाखच्या दरी बहरून जातात.
हा फेस्टिवल मुख्यतः लेहमधील डोमखर आणि कारगिलमधील गनखोन आणि संजाक भागांत केले जाते.
या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे या कार्यक्रमात स्थानिक लोक एकत्र येत त्यांची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि कला सादर करतात.
संगीत, नृत्य, पारंपारिक खेळ आणि विविध प्रदर्शनामुळे पर्यटक हा 'एप्रिकॉट ब्लॉसम फेस्टिवल' बघायला आवर्जून येतात.
'एप्रिकॉट ब्लॉसम फेस्टिवलला येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक खुबानीपासून तयार केलेले पदार्थ खरेदी करण्याची संधी मिळते.
हा 'एप्रिकॉट ब्लॉसम फेस्टिवल फक्त लडाखमधील निसर्गसौदर्यच दाखवत नाही तर लडाखच्या ग्रामीण जीवनाशी जवळून ओळखही करून देतो.