उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?

टॅनिंग का होते?

कडक उन्हात सूर्याच्या Ultraviolet Radiation (UV Rays) मुळे त्वचेवर टॅनिंग आणि जळजळ होऊ शकते.

सनस्क्रीन वापरणे आवश्यक?

उन्हात बाहेर पडताना SPF 50 सनस्क्रीन लावा. SPF असलेले सनस्क्रीन फिल्टरेशन प्रदान करते आणि तुलनेत सुमारे ९८% हानिकारक किरणांना रोखते. यामुळे त्वचा UV किरणांपासून सुरक्षित राहते.

चेहरा झाकून ठेवा...

उन्हात जाताना, स्कार्फ / कॅप वापरा, सनग्लासेस लावा यामुळे त्वचेचे संरक्षण होते.

घरगुती उपायांचे फायदे...

दही, मध किंवा कोरफड जेलचा वापर करा. दही मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचा उजळवते. दिवसातून पुरेसे पाणी, नारळ पाणी, लिंबू सरबत किंवा कोकम सरबत प्या जेणेकरून शरीर आणि त्वचा आतून थंड राहील.

जड मेकअप टाळा...

उन्हाळ्यात जड मेकअप टाळा, कारण यामुळे त्वचेची छिद्रे (pores) बंद होऊ शकतात.