उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी काय करावे?

डिहायड्रेशन म्हणजे काय?

उन्हाळ्यात जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, यालाच डिहायड्रेशन म्हणतात.

दररोज किती पाणी प्यावे?

उन्हाळ्यात रोज ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहते.

हायड्रेशनसाठी उपयुक्त पेये...

नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक, फळांचे ज्यूस

डिहायड्रेशनची लक्षणे...

जास्त तहान लागणे, डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे. गंभीर लक्षणे- पोटदुखी, गडद रंगाची लघवी, त्वचा कोरडी होणे

उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका का वाढतो?

जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो. उन्हाळ्यात पुरेसे पाणी आणि नैसर्गिक पेये घेतल्यास डिहायड्रेशनपासून बचाव होतो.