कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी ‘ही’ पेय; जरूर प्या!

सध्या सगळीकडेच उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. या काळात उष्माघात, शरीरातील पाण्याची कमतरता, चक्कर येणे, डोकेदुखी आणि थकवा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीर हायड्रेट आणि थंड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हाच्या झळांपासून संरक्षण करण्यासाठी खालील पेय नियमित पिणे फायदेशीर ठरेल.

लिंबू पाणी

लिंबू पाणी हे व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्सने परिपुर्ण असते. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी लिंबू पाणी हा उत्तम उपाय आहे. लिंबू पाणी उष्णतेमुळे येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर करून शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करते.

ताक

ताक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी मदत करते. ताक पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

कोकम सरबत

कोकणात हमखास बनवला जाणारा कोकम सरबत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते. कोकम फळाच्या सालीपासून हे पेय बनवले जाते. कोकम सरबत पचनास उत्तम, ॲसिडिटीवर गुणकारी आणि उष्माघातापासून संरक्षण करते.

नारळ पाणी

नारळ पाणी हे उन्हाळ्यात एक सर्वोत्तम पेय मानले जाते. जे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी मदत करते.

कैरीचे पन्हे

कैरीचे पन्हे हे उन्हाळ्याच्या कडक उन्हापासून वाचण्यासाठी मदत करते. हे कैरीचे पन्हे शरीराला थंडावा, ऊर्जा आणि उष्माघातापासून संरक्षण देते.

लस्सी

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड आणि थंड ठेवण्यासाठी 'लस्सी' फायदेशीर ठरते. लस्सी पचन सुधारते आणि शरीराला थंडावा देते.