एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील जीडीपीच्या तुलनेत आयातीचा वाटा पाहून आयात निर्भरता ठरवली जाते.
बहुतेक आयात निर्भर देश हे कमी लोकसंख्या किंवा व्यापारकेंद्र असलेले आहेत.
हाँनकाँगची आयात निर्भरता जीडीपीच्या सुमारे १७८% इतकी आहे.
लक्झेम्बर्ग- १६०% सॅम मरिनो- १५५% सिंगापूर- १४४% जिबुटी- ११५% नौरू- १११% सेशेल्स- १०३% आयर्लंड- १०२% किरीबती- १०२% माल्टा- १००%
जागतिक बँकेने प्रसारित केलेल्या माहितीनुसार, या देशांची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आयातीवर अवलंबून आहे.