खनिज तेलाच्या उत्पादनात सौदी, रशिया यांच्याही पुढे आहे 'हा' देश

सौदी अरेबिया आणि रशियालाही मागे टाकत अमेरिका पहिल्या क्रमांकावर...

जगातील खनिज तेलाचे (क्रूड ऑइल) सर्वाधिक उत्पादन अमेरिकेत होते. २०२५ मध्ये अमेरिकेचे उत्पादन १३.६१ दशलक्ष बॅरल प्रति दिवस (bpd) इतके झाले होते.

२०२६ साठी अंदाजे उत्पादन...

२०२६ मध्येही उत्पादन सुमारे १३.५३ दशलक्ष bpd राहण्याचा अंदाज आहे.

उत्पादन वाढण्यामागचे कारण काय?

शेल ऑइल उत्पादन आणि हायड्रॉलिक फ्रॅक्चरिंग (फ्रॅकिंग) तंत्रज्ञान यासोबतच, अमेरिकेतील परमियन बेसिन भागातून मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल उत्पादन होते.

धोरणांचा प्रभाव...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या “ड्रिल बेबी ड्रिल” धोरणामुळे उत्पादनात सुमारे ६ लाख bpd वाढ झाली.

इतर मोठे उत्पादक देश...

अमेरिकेनंतर या देशांचा क्रम लागतो- सौदी अरेबिया, रशिया, कॅनडा, चीन, इराण, यूएई आणि इराक.