सोनं-चांदी नाही, तर या धातूने दिले १५०% रिटर्न्स!

सोनं-चांदीच्या भावात जोरदार वाढ

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दोन्ही धातूंना नेहमीच पसंती दिली जाते.

पण आता चर्चेत आहे आणखी एक धातू…

सोनं-चांदीव्यतिरिक्त एक असा धातू आहे, ज्याने गुंतवणूकदारांना चकित केलं आहे. तो धातू म्हणजे प्लॅटिनम!

एका वर्षात तब्बल १५०% रिटर्न्स

प्लॅटिनमने अवघ्या एका वर्षात तब्बल १५० टक्के रिटर्न्स दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल आता प्लॅटिनमकडे झुकताना दिसतोय.

प्लॅटिनमचे दर किती वाढले?

वर्षभरापूर्वी दर : ९०० ते ९५० डॉलर प्रति औंस सध्याचा दर : २४७० डॉलर प्रति औंस

प्लॅटिनम इतका महाग का आहे?

प्लॅटिनम हा धातू अत्यंत दुर्मिळ आहे, पृथ्वीवर फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे, मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने याच्या किंमती प्रचंड आहेत.