माऊंट एव्हरेस्ट सर करण्यात भारत तिसर्या क्रमांकावर!
तब्बल ८,८४८ मीटर उंचीचा माऊंट एव्हरेस्ट सर करणं प्रत्येकासाठी शक्य नसला, तरी त्याची ओढ जगभरातील गिर्यारोहकांच्या मनातून कधीच कमी होत नाही.
हिमालयन डेटाबेस (१९५३-२०२३) नुसार, माऊंट एव्हरेस्ट सर्वाधिक वेळा यशस्वी गाठणाऱ्या गिर्यारोहकांमध्ये नेपाळचा पहिला क्रमांक लागतो.
त्यासोबतच, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, तर भारत आणि चीन प्रत्येकी ५४४ यशस्वी गिर्यारोहकांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.