हिवाळ्यात दिवस लहान का असतात?
पृथ्वीचा अक्ष २३.५° अंशांनी झुकलेला आहे. हा झुकावच ऋतु बदलण्यामागचं मुख्य कारण!
हिवाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्यापासून दूर झुकलेला असतो. त्यामुळे पृथ्वीवर सूर्यकिरण सरळ न पडता तिरपे पडतात.
त्यासोबतच, सूर्य लवकर मावळतो आणि उशिरा उगवतो. त्यामुळे दिवस लहान आणि रात्री लांब होतात.
साधारण २१ किंवा २२ डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस असतो आणि हा दिवस 'हिवाळी संक्रांती' म्हणून ओळखला जातो.
हिवाळी संक्रांतीनंतर, दिवस पुन्हा हळूहळू मोठे होऊ लागतात.