'यूपीआय' ने चुकीच्या व्यक्तीला पेमेंट झाले तर...

'यूपीआय' ने पेमेंट करताना बऱ्याचदा चुकीच्या व्यक्तीला पेमेंट होते, मात्र आता त्याची चिंता नाही!

'आरबीआय'ने नुकत्याच जारी केलेल्या सेर्क्युलरनुसार असे झाल्यास, पैसे ज्या व्यक्तीच्या खात्यात गेले त्याचे आणि तुमचे खाते एकाच बँकेत असेल, तर तुमचे पैसे लवकर रिफंड मिळू शकतात.

पण खाते एकाच बँकेत नसेल तर...

ज्या व्यक्तीला पैसे गेले आहेत त्याला संपर्क करून चुकीच्या पेमेंटचा स्क्रीनशोट पाठवा आणि तुमचे पैसे परत करण्यासाठी विनंती करा.

'त्या' व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिला तर...

पैसे परत करण्यास नकार दिला तर १८००१२०१७४० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा आणि यूपीआय अॅपच्या ग्राहक सेवेशी संपर्क करा.

या व्यतिरिक्त आणखी कोणते पर्याय आहेत ?

यासंदर्भात तुम्ही बँकेला संपर्क करून तक्रार करू शकता. एनपीसीआयकडे देखील तक्रार करू शकता. जेणेकरून तुमचे पैसे लवकर परत मिळताल.