'Vogue India' च्या मुखपृष्ठावर महिला क्रिकेटर झळकल्या
'Vogue India' च्या मुखपृष्ठावर हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा, दिप्ती शर्मा आणि प्रतिका रावल या एकत्र दिसल्या.
वर्ल्ड कप च्या यशानंतर महिला क्रिकेट संघ अखेर प्रकाशझोतात आले.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रवास हा अतिशय प्रेरणादायी आणि संघर्षमय राहिला आहे. क्रिकेटसारख्या पारंपारिक पुरुषप्रधान खेळात महिला क्रिक्रेटर्सना आपलं स्थान मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे.
हया फोटोशूटमधून भारतीय क्रीडाक्षेत्राची नव्याने ओळख करून देणाऱ्या महिलांच्या मेहनतीचा, संघर्षाचा आणि स्वप्नांचा सन्मान करण्यात आला आहे.