'या' रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर कधीच बरोबर येत नाही! तरीही एकही ग्राहक चिडत नाही

'रेस्टॉरेंट ऑफ मिसटेकन ऑर्डर्स'

हे आहे जपानमधील टोकियो शहरातील एक अनोख रेस्टॉरेंट, जिथे चुकीच्या ऑर्डर्सही आनंद देतात!

'मिसटेकन ऑर्डर्स' म्हणजे नेमकं काय ?

ग्राहक एखादी डिश मागतात आणि कधी काहीतरी वेगळंच प्लेटमध्ये येतं. पण हे रेस्टॉरेंट चुकीची ऑर्डर्स देखील स्वादिष्ट असेल याची खात्री देत आहे.

'ऑर्डर्स' चुकीच्या येण्यामागे कारण काय ?

या रेस्टॉरेंटमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी हे जेष्ठ नागरिक असून, डिमेन्शियासारख्या (विसरण्याचा आजार) आजाराने त्रस्त आहेत. मात्र त्यांच्याकडून चुकीच्या ऑर्डर येणं हेच या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य आहे.

या रेस्टॉरेंटची सुरूवात कशी झाली ?

जपानमधील टीव्ही निर्माता आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक 'शिरो ओगुनी' यांच्या कल्पनेतुन सुरू झालेला हा 'पॉप-अप' रेस्टॉरेंट प्रकल्प पहिल्यांदा २०१७ मध्ये टोकियोत आयोजित करण्यात आला.

'पॉप-अप' म्हणजे काय ?

'पॉप-अप' म्हणजेच थोड्या दिवसांसाठी तात्पुरते उघडले जाणारे रेस्टॉरंट, डिमेन्शिया असलेल्या लोकांना “काम करण्याची संधी” देऊन त्यांचा आत्म-विश्वास वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प आहे.त्यामुळेच या रेस्टॉरंटचा संदेश देखील असा आहे कि, “चूक आली तरी अन्न स्वादिष्ट असेल आणि अनुभव अविस्मरणीय असेल!”