फोनमधील फोटो डिलिट झाले तर...

स्मार्टफोनमधून जुने फोटो अचानक डिलिट होतात, काय करावं ?

स्मार्टफोनमध्ये गुगल फोटोजचा बॅकअप ऑन ठेवायला विसरू नका. त्यामुळे फोटोज फोनमधून डिलिट झाले, तरी गुगल अकाउंटला सेव्ह राहतात.

डिलिट झालेले फोटो परत कसे मिळवावे ?

बॅकअप घेतलेले फोटो ६० दिवसांसाठी, तर बॅकअप नसलेले फोटो ३० दिवसांसाठी 'ट्रॅश फोल्डर'मध्ये जमा असतात. तेथून तुम्ही ते फोटो पुन्हा सेव्ह करू शकता.

'ट्रॅश फोल्डर'मधून फोटो पुन्हा सेव्ह कसे करावे ?

गुगल फोटोज अॅप उघडा, लायब्ररीवर टॅप करा आणि ट्रॅशमध्ये जा. तेथे तुम्हाला तुमचे डिलिट केलेले फोटो सापडतील, तेथून तुम्हा ते रिस्टोअर करू शकता.

जर फोटो 'ट्रॅश फोल्डर'मध्ये देखील नसतील तर...

अश्या परिस्थितीत तुम्ही डेटा रिकव्हर अॅप्सचा वापर करू शकता, हे अॅप्स गुगल प्लेस्टोरवर उपलब्ध असून, त्याचा वापर करून तुम्ही फोटो मिळवू शकता.