आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची सुरूवात १९९९ मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये झाल्याचं मानले जाते. हि संकल्पना उदयास येण्यासाठी दोन दशके धडपड करण्यात आली होती.
वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम टीलकसिंग यांनी १९९९ मध्ये जगभरातील सकारात्मक पुरुष आदर्शांना प्रेरणा देण्यासाठी हा दिवस प्रस्थापित केला.
थॉमस ऑस्टर यांनी ७ फेब्रुवारी १९९२ रोजी औपचारिकपणे आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची सुरुवात केली.
७ फेब्रुवारी १९९४ रोजी माल्टा येथे जगातील दीर्घकाळ चालणारा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला होता. मात्र हया नंतर २००९ मध्ये माल्टीज एएमआर समितीने ही तारीख बदलून १९ नोव्हेंबर केली.
पुरुष आणि मुलांबद्दल कृतज्ञता, समज आणि संवेदनशीलता वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात येतो.