या आधार अॅपच्या माध्यमातून युजर्स आता एकाच मोबाईल वरून कुटुंबातील पाच सदस्यांचा आधार कार्ड जोडू शकतात.
युजर्सच्या गोपनीयतेची काळजी घेत, या अॅपवर बायोमेट्रिक लॉकची सुविधा देखील देण्यात आली आहे. ज्यामुळे युजर्सना आता सरकारी कार्यालयात आपली ओळख व्हेरिफाय करणं अधिक सोपं होणार आहे.
या अॅपचे विशेष वैशिष्ट म्हणजे, हे अॅप ऑफलाईन मोडमध्ये म्हणजेच इंटरनेट शिवाय देखील चालते. त्यामुळे युजर्सची चांगलीच सोय होणार आहे.