‘टाइम आऊट सिटी लाईफ इंडेक्स २०२५’ च्या सर्वेक्षणात मुंबईला आशिया खंडातील सर्वात ‘आनंदी शहर’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
चीनमधील बीजिंग आणि शांघाय या दोन शहरांना मागे टाकत मुंबईने हे अव्वल स्थान मिळवले आहे.
जगातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीत अबूधाबी (यूएई) पहिल्या स्थानी असून, मुंबईने पाचवे स्थान पटकावले आहे.
संस्कृती, खाद्यसंस्कृती, नाईटलाइफ आणि जीवनशैली या घटकांच्या आधारे मुंबईला हा मान मिळाला आहे.