‘जनरेशन झेड’च्या युगात काय होतंय?

‘जनरेशन झेड’च्या युगात सर्वांना ‘आयफोन’चे फार वेड आहे. मात्र, असे काय आहे ‘आयफोन’मध्ये? चला पाहूया...

‘आयफोन 16’नंतर ‘17’चे लॉन्चिंग...

आता चक्क ‘आयफोन 16’नंतर ‘17’चे लॉन्चिंग होणार आहे. भारतात ‘आयफोन’चे फार वेड आहे. काही वर्षांपूर्वी ‘आयफोन’ हा फक्त श्रीमंत लोक वापरायचे, असा समज होता. मात्र, आता अगदी 12 वर्षांच्या मुलाच्या हातातही ‘आयफोन’ पाहायला मिळतो.

‘अ‍ॅपल एवी ड्रॉपिंग इव्हेनट’ म्हणजे काय?

‘अ‍ॅपल एवी ड्रॉपिंग इव्हेनट’ म्हणजे ‘अ‍ॅपल’चे सर्व मॉडेल एकत्रितपणे लॉन्च केले जातात. या इव्हेनटमध्ये फक्त ‘आयफोन’ नाही, तर ‘आयफोन’चे टॅब, लॅपटॉप इ. गोष्टीही लोकांसाठी उपलब्ध असतात.

कुठे होणार लॉन्चिंग?

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टिनो येथील ‘अ‍ॅपल पार्क’च्या स्टीव्ह जॅब्स थिएटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

नवीन गॅझेट लॉन्च होण्याची शक्यता...

‘आयफोन 17’सोबतच एक नवीन गॅझेट लॉन्च होण्याची शक्यता आहे, त्यासोबतच भारतीयांना हा कार्यक्रम Apple.com, अ‍ॅपल टीव्ही आणि अ‍ॅपलच्या युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे.

‘आयफोन’ची सिरिज...

‘आयफोन’ची सिरिज ही क्रमांकानुसार असते. सर्वप्रथम ‘आयफोन 6’ आणि पुढे क्रमाने वाढत जाऊन आता ‘17’वर येऊन पोहोचले आहे.