ओवसे का पुजले जातात?

गणपती आपल्या घरी ५ किंवा ७ दिवसांसाठी विराजमान होतात. त्यापुर्ण सप्ताहमध्ये दिवशी गौरी पुजन केले जाते आणि पाचव्या दिवशी ओवसे पुजले जातात, मात्र हे ओवसे का पुजले जातात? फक्त गणपतीमध्ये ओवसे पुजले जातात का? चला तर मग जाणून घेऊया ओवसा पुजनाची प्रथा...

ओवसे हे सौभागयाचे प्रतिक...

गौरीला गणपतीची आई किंवा बहिण मानले जाते. गौरी पुजनाच्या दुसऱ्या दिवशी ओवसे पुजले जातात. ओवसे फक्त विवाहित स्त्रीच पुजू शकते कारण ओवसे हे सौभागयाचे प्रतिक मानले जाते.

सुप हे घरातील सुबत्तेचे लक्षण मानले जाते…

गौराईची पुजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर तिच्याकडे असणारे भरलेले सुप हे घरातील सुबत्तेचे लक्षण मानले जाते.

माहेरवाशिनीचे स्थान दिले जाते...

गौरी घरी आली म्हणजे पार्वती आपल्या गणरायाला घेऊण जायला आपल्या माहेरी येते असे म्हणतात. ही गौरी माहेरात माहेरवाशिणी असते, तिला खुप काही खाऊ घालतात आणि तिचे लाड पुरवले जातात. ओवस्याच्या स्वरूपात तीच्या पतीच्या दिर्घआयुष्यासाठी उपवास देखिल करते.

ओवसे म्हणजे ओवासणे.....

ओवसा म्हणजे ओवासणे किंवा ओवाळणे. गौरीचा ओवसा करण्याची पद्धत पुरातन काळापासून सुरू आहे. गौरीला ओवासणे हे एक सुवासिनीनी केले जाणारे प्राचीन व्रत आहे असे ही म्हणतात.

नववधू गौराईला ओवसून तिची भक्तीभावाने ओटी भरते

पाच किंवा दहा सुपे गौरीपुजनाच्या दिवशी नववधू गौराईला ओवसून तिची भक्तीभावाने ओटी भरते.सुपात रानभाज्यांची पाने, पाच प्रकारची फळे, सौभाग्यलेणी, पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या, सुकामेवा, धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते.

ओवसे भरण्याची वेगवेगळी पद्धत!

ओवसे भरण्याची वेगवेगळी पद्धत आहे. ओवसा हा फक्त सुपामध्ये नाही तर हळदिच्या पानांममध्ये देखिल भरला जातो. कोकणामध्ये ओवसा हा लाकडी सुपामध्ये पुजला जातो तर कोल्हापुर येथे हळदीच्या पानांनमध्ये पुजले जाते. सातारा येथे ओवसे हे मकरसंक्रांतीच्या दिवशी पुजले जातात.

महा-एमटीबी इकोफ्रेंडली गणेशा २०२५

आपल्या गणपती बाप्पाची आरास पर्यावरणपूरक करा आणि मुंबई तरुण भारत आयोजित 🌎 महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ 🌿 प्रस्तुत 🙏 महा-एमटीबी इकोफ्रेंडली गणेशा २०२५ 🙏 या पर्यावरणपूरक 𓆩ꨄ︎𓆪 घरगुती गणेशमुर्ती आणि मखर सजावट स्पर्धेत सहभाही व्हा!