दुर्वा गणपतीला का वाहिल्या जातात हा मोठा प्रश्न

गणेश उत्सव हे नाव काणी पडताच आपल्याला मोदक तर आठवतात आणि सर्वात म्हत्वाचे आठवते ते म्हणजे दुर्वा. दुर्वा गणपतीला का वाहिल्या जातात हा मोठा प्रश्न लहान मुलांना तर कधी-कधी मोठ्यांना सुद्धा विचार करायला लावतोच...

२१ दुर्वा का वाहिल्या जातात?

गणपतीला २१ दुर्वा का वाहतात या मागे देखिल पौराणिक कथा आहे.

अनलासुर नावाचा असुर

ऋषि मुनी आणि सर्व देवताना अनलासुर नावाचा असुर त्रास देत होता. अनलासुर हा फार शक्तीशील होता. अनल म्हणजे अग्नि.

असुराला गिळल्यामुळे...

ऋषि मुनी आणि सर्व देवतांच्या आग्रहमुळे गणपतीने अनलासुराला गिळुन टाकले. असुराला गिळ्लया नंतर त्याची तप्त उर्जेने गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली.

२१दुर्वांचा उपाय !

८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ हिरव्यागार दुर्वा गणपतीच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषीनी २१दुर्वांची जुडी गणरायाला खायला दिली.

२१दुर्वा खाल्यानंतर...

गणपतीने २१ दुर्वींची जुडी खाल्यानंतर त्याच्या पोटात होणारी जळजळ थांबली. यापुढे मला कोणीही २१दुर्वा अर्पण केल्यास हजारो यज्ञ, व्रते, दान, आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभेल असे गणपती म्हणाले. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.

दुर्वा औषध म्हणून वापरले जाते का?

दुर्वा ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. दुर्वा ही औषध म्हणून देखिल वापरली जाते. पोटात होणारी जळजळ कमी करण्यसाठी दूर्वा अगदी गुणकारी आहे. फक्त औषध नव्हे तर ही गणपतीची पुजा करताना ही वापरली जाते.

महा-एमटीबी इकोफ्रेंडली गणेशा २०२५

आपल्या गणपती बाप्पाची आरास पर्यावरणपूरक करा आणि मुंबई तरुण भारत आयोजित 🌎 महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ 🌿 प्रस्तुत 🙏 महा-एमटीबी इकोफ्रेंडली गणेशा २०२५ 🙏 या पर्यावरणपूरक 𓆩ꨄ︎𓆪 घरगुती गणेशमुर्ती आणि मखर सजावट स्पर्धेत सहभाही व्हा!