आपल्या हिंदू धर्मात सर्व देव-देवतांचे वाहन हे प्राणीच आहेत. तसेच गणपती बाप्पाचे वाहन हे उंदिर का? हा लहान मुलांना सारखा प्रश्न पडतो. अश्या प्रश्नाची उत्तर फक्त कथेत दडलेली आहेत.
इंद्र देवाच्या दरबारी सभा भरली होती. गाण गाण्यासाठी कौंच नावाच्या गंधर्वाला बोलावले होते. इंद्र देवाचे बोलावणे म्हटल्यावर गंधर्व तातडीने सभेकडे पळाला मात्र घाई-घाईमध्ये बामण नावाच्या ऋषींना त्याची लाथ लागली.
गंधर्वची लाथ लागल्यानंतर बामण ऋषी क्रोधित झाले. रागाध्ये त्यांनी गंधर्वला शाप दिला आणि म्हणाले ‘इतकी घाई करतोयस तर तू तुरू-तुरू धावणारा उंदीर होशील.’
कौंच गंधर्वाचे रूपांतर हे उंदरात झाले आणि ते पाराशर ऋषींच्या आश्रमाजवळ पडले. आश्रमात या उंदराने फार गोंधळ निर्माण केला. आश्रमातल्या अन्न-धान्यांची नासाडी उंदिर करू लागला.
आश्रमातल्या ऋषींनी उंदराला थांबवण्याचे फार प्रयत्न केले मात्र उंदिर काही थांबेना. आखेर पाराशर ऋषीनी गणपतीची प्रार्थना केली आणि गणपतीला बोलावुन घेतले.
गणपतीने पाश टाकूण उंदराला पकडले मात्र उंदिर सुटकेसाठी पळ काढायचा प्रयत्न करत होता. गणपतीने त्याला वर मागण्यास सांगितले अगदी गर्विष्टेने तो उंदिर म्हणाला की मला तुमच्याकडून काहीही नको याउलट तूच माझ्याकडे वर माग.
उंदराचे बोलणे ऐकून चतुर गणपतीने ‘माझे वाहन हो’ असे वर मागितले आणि पटकन जाऊन उंदराच्या पाठीवर बसले. नाइलाजाने उंदराला हे वर स्वीकारावे लागले. तेव्हा पासून उंदिर हे गणपतीचे वाहन झाले.
असे मानले जाते की गणेशउत्सवा दरम्यान उंदिर मामांचे दर्शन घेणे चांगले असते.
आपल्या गणपती बाप्पाची आरास पर्यावरणपूरक करा आणि मुंबई तरुण भारत आयोजित 🌎 महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ 🌿 प्रस्तुत 🙏 महा-एमटीबी इकोफ्रेंडली गणेशा २०२५ 🙏 या पर्यावरणपूरक 𓆩ꨄ︎𓆪 घरगुती गणेशमुर्ती आणि मखर सजावट स्पर्धेत सहभाही व्हा!