उकडीचे मोदक हे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते, तुपाची धार आणि गरम मोदक हा एक छान बेत आहे मात्र हे मोदक गणपतीला का बरं आवडले असतील?
आपल्या गणपती बाप्पाची आरास पर्यावरणपूरक करा आणि मुंबई तरुण भारत आयोजित 🌎 महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ 🌿 प्रस्तुत 🙏 महा-एमटीबी इकोफ्रेंडली गणेशा २०२५ 🙏 या पर्यावरणपूरक 𓆩ꨄ︎𓆪 घरगुती गणेशमुर्ती आणि मखर सजावट स्पर्धेत सहभाही व्हा!
एके दिवशी अत्री ऋषी आणि त्यांच्या पत्नी अनसुया यांनी महादेव आणि माता पार्वतीला जेवायला बोलवले मात्र बालगणेश यांना कैलास पर्वतावर एकटे कसे ठेवायचे म्हणून गणपतीला आपल्या सोबत घेऊन गेले.
भगवान महादेव आणि माता पार्वती गणेशासह रांगेत जेवायला बसले. माता अनसुया यांनी तिघांनाही लांब केळीच्या पानावर जेवायला वाढले, विविध प्रकारचे पदार्थ अनसुया यांनी बनवले होते. असे म्हणतात माता अनसुया यांना पाकसिद्धी प्राप्त झाली होती.
माता अनसुया अगदी आग्रहाने वाढत होत्या. महादेव आणि माता पार्वतीचे पोट भरले. बालगणेशने हळूच आपल्या आईकडे पाहिले आणि म्हणाले ’’माझे पोट भरले नाही’’ हे पाहूण माता अनसुयाने हसत बालगणेशला विचारले काय करू तुझ्यासाठी? तुला आवडेल ते करून वाढते जेणेकरून तुझे पोट भरेल... काही तरी गोड करा असे बालगणेशने सांगितले.
काही वेळेनंतर माता अनसुयानी केळीच्या पानात लुसलुशीत दिव्य मोदक घेऊन आल्या, माता पार्वती आणि महादेवांनाही दिव्य मोदक खाण्याचा आग्रह केला मात्र पोट भरल्या कारणाने त्यांनी हा आग्रह नाकारला. हळूच सर्व मोदकांचा ताब्बा गणेशांने घेतला.
गोड गोड दिव्य मोदक गणपतीला फार आवडले. एक नाही, दोन नाही तब्बल २१ मोदक खाल्यानंतर गणपतीचे पोट भरले. हे पाहून माता पार्वती सुद्धा गणपतीला २१मोदक करून देऊ लागली.
ही कथा सर्वाना माहित नसेल कारण भाऊ कार्तिकेय आणि गणपतीमध्ये जेव्हा पृथ्वी प्रदिक्षणेची स्पर्धा झाली तेव्हा जो जिंकणार त्यास मोदक खायला मिळणार असे पार्वती मातेने सांगितले. असेच गणपतीने आपल्या आई-वडिलांच्या प्रदक्षिणा घातल्या आणि हेच माझे जग आहे असे सांगितले आणि मोदकांचे बक्षीस जिंकले. तेव्हा पासून गणपतीला मोदक फार आवडतात असे मानले जाते.
दिव्य मोदक म्हणजे काही वेगळे नाही तर दिव्यांच्या आकाराचे मोदक असे मानले जाते.