पहिल्या ट्रॅफिक सिग्नलची सुरुवात १८६८ रोजी लंडन येथे झाली. लंडनच्या ब्रिज स्ट्रीट, ग्रेट जॉर्ज स्ट्रीट आणि पार्लमेंट स्ट्रीटवरील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी या ट्रॅफिक सिग्नलची निर्मिती करण्यात आली.
पहिल्या ट्रॅफिक सिग्नलची निर्मिती रेल्वे अभियंता जॅन पिक नाईट यांनी केली. त्याकाळी हे ट्रॅफिक सिग्नलस गॅसवर चालणारे होते.
सर्वांत पहिले लाल, हिरव्या रंगांचे दिवे लावण्यात आले. दि. २ जानेवारी 1869 रोजी पदपथाखालील एका गॅस लाईनमध्ये गळती झाल्यामुळे दिव्यांचा स्फोट झाला. त्या कारणाने ते दिवे बंद करण्यात आले.
रात्री लाल हा रंग ‘थांबा’ असा संदेश देत असे, तर हिरवा हा सावधगिरीचा संदेश देत असे. काही वर्षांनंतर लाल, हिरव्यासह पिवळ्या रंगाचा समावेश करण्यात आला.