मन मोकळं करण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जसे हसण्यासाठी ‘लाफ्टर क्लब’ असतात, तसेच रडण्यासाठी आता ‘क्राईंग कल्ब’ची कल्पना प्रत्यक्षात उतरत आहे.
हसणे हासुद्धा एक व्यायाम असतो. त्यासाठी लोक येतात आणि फक्त हसतात. त्यामुळे जीवनातील अन्य दुःखांकडे दुर्लक्ष करून लोक काही काळ आनंदात घालवतात. दुसरीकडे ‘क्राईंग क्लब’मध्ये लोक आपल्या दुःखांना अश्रूंद्वारे वाट मोकळी करून देतात.
असे मानले जाते की, जसे हास्य आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते, तसेच रडण्याचेही काही फायदे असू शकतात. रडण्याने आपले मानसिक ताणदेखील कमी होऊ शकतात.
जपानमधील ‘रुईकात्सु’ चळवळीपासून प्रेरणा घेऊन ‘क्राईंग क्लब’चा उपक्रम राबवण्यात आला आहे. ‘रुईकात्सु’ हा एक जपानी शब्द आहे. त्याचा अर्थ ‘अश्रू ढाळणे’ असा होतो. ‘रुईकात्सु’ ही एक जपानी चळवळ आहे, जी लोकांना जाणूनबुजून दुःखी चित्रपट पाहण्यास, भावनिक संगीत ऐकण्यास किंवा अश्रू ढाळणार्या कथा वाचण्यास प्रोत्साहित करते, जेणेकरून रडू येईल.