बॉलीवूडमधील कित्येक कलाकारांचे नाव ऐकून आपल्याला त्यांचे चित्रपट आठवतात. मात्र, काही कलाकारांची नावेही खरी नाहीत, हे तुम्हाला माहीत आहे का?
हो, अभिनेता सलमान खानचे खरे नाव हे वेगळे आहे. अब्दुल रशीद सलीम सलमान खान असे आहे!
अभिनेता रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांमध्ये बहुदा लोकांचा घोळ होतो. मात्र, हे दोन्ही कलाकार वेगळे आहेत. अभिनेता रणवीर सिंगचे खरे नाव हे रणवीर भवनानी असे आहे.
अभिनेता सैफचेदेखील सैफ अली मन्सूर अली खान पतौडी असे खरे नाव आहे.
अभिनेत्री कतरिना कैफ हीचे खरे नाव हे कतरिना रोझमेरी टर्कोट असे आहे.
अभिनेत्री कियारा अडवानीने बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याआधी आपले नाव बदलले, असे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले. तिचे मूळ नाव हे आलिया अडवानी असे होते.
अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयासाठी आणि बिनधास्त स्टंट करण्यासाठी ओळखला जातो. मात्र, अक्षय हा सिनेमासृष्टीत येण्याआधी त्याचे नाव हे राजीव हरी ओम भाटिया असे होते.
अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही नाव बदलले आहे. चित्रपटसृष्टीमध्ये येण्यापूर्वी त्यांचे नाव हे इन्कलाब श्रीवास्तव असे होते.
अभिनेता हृतिक रोशनचे नाव पूर्वी हृतिक राकेश नागरथ असे होते.
विशेष करून फिटनेससाठी ओळखल्या जाणार्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे मूळ नाव हे अश्विनी शेट्टी असे होते.