चक्क २२०० कोटी पगार!

मेटा हे नाव सर्वांना माहितीचं आहे मात्र काही दिवसांपूर्वी मेटाच्या आफिसमध्ये मॅट डेटकेया तरूणाला चक्क २२०० कोटी रूपये पगार दिला गेला मात्र का?

मॅट डेटके कोण आहे?

मॅट डेटके एआयया विभागात प्रसिद्ध आहे. त्याने वॉशिंग्टन विद्यापीठात संगणक विज्ञान विषयात पीएच.डी. प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला परंतु तो मध्येच सोडून दिला. त्यानंतर तो सिएटलमधील अॅलन इन्स्टिट्यूट फॉर एआयमध्ये सामील झाला, जिथे त्याने चॅटबॉट 'मोल्मो' विकसित करण्यात प्रमुख भूमिका बजावली.

कंपनीच्या सीइओने स्वतःहून भेट दिली...

मॅट डेटकेने मेटाची १,००० कोटी रुपयांची ऑफर नाकारली कंपनीचे सीइओ मार्क झुकरबर्ग यांनी स्वतःहून त्याला भेटून दुसरी ऑफर दिली. २२०० कोटी रूपयांची नोकरी त्याने काही वेळ विचार करून नंतर स्वीकारली.

मेटासाठी मार्क झुकरबर्गची ’भरती’ योजना काय आहे?

झुकरबर्गला मेटा हे आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये जागतिक स्तरावर असावे असे वाटते आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी त्याने अमेरिकेतील स्टार्टअप थिंकिंग मशीन्स लॅबमधून टॉप टॅलेंट शोधण्यासाठी आक्रमक भरती मोहीम सुरू केली. या शोधात झुकरबर्ग हा डेटकेला भेटला त्याचे कार्यक्षमता पाहून मार्क प्रभावित झाले आणि त्याला १२५ दशलक्ष डॉलर्सची विक्रमी ऑफर दिली.