’फ्रेंडशिप डे’चा इतिहास सुद्धा आहे!

हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक जॉइस हॉल यांनी १९५८ मध्ये ’फ्रेंडशिप डे’ची कल्पना संयुक्त राष्ट्रा समोर मांडली होती.

कल्पनेला चालना २०११ साली मिळाली

२०११मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारलेल्या ठरावानुसार विविध देशांच्या लोकांमध्ये वंश, रंग, लिंग, धर्म, वांशिकता आणि इतर घटकांची पर्वा न करता मैत्रीचे मजबूत बंधन निर्माण करण्यासाठी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा मैत्री दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

फ्रेंडशिप बॅंडची मज्जा...

’फ्रेंडशिप डे’च्या दिवशी लहान मुल आणि तरूण मुल-मुली हा दिवस अगदी उत्साहाने साजरा करतात. मैत्रीचं प्रतीक म्हणून फ्रेंडशिप बॅंड, ग्रिटिंग कार्डस, किंवा काहीही छोटी भेट वस्तू एकमेकांना देतात.