‘ट्वेल्थ फेल’ हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला, मराठीत ‘श्यामची आई’ हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला, त्याचवेळी सर्वोत्तम अभिनेता आणि सर्वोत्तम अभिनेत्री हे पुरस्कार देखिल जाहिर झाले आहेत.
७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३' साठी सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे.
शाहरूख खान, विक्रांत मेस्सी आणि राणी मुखर्जी हे ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३' मध्ये ठरले सर्वोत्तम अभिनेता व अभिनेत्री
द केरला स्टोरीसाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी सुदिप्तो सेन यांना ‘सुवर्णकमळ’ देण्यात येणार आहे.
नाळ-२ चित्रपटातील भार्गव जगतापला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
सर्वोत्कृष्ट मनोरंजन चित्रपटासाठी करण जोहर प्रदर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाची निवड. अभिनेत्री आलिया भट्टने चित्रपटाची आठवण म्हणून सोशल मिडियावर शेअर केला डान्स रिहर्सलचा व्हिडिओ पोस्ट.
राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्तम मेकअपसाठी सॅम बहादूर या चित्रपटाची निवड
तमिळ पुक्कलम या चित्रपटातले विजयराघवन आणि पार्किंग या चित्रपटातले मुथुपेटाई सोमू भास्कर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून निवड
सर्वोत्तम ध्वनी डिझाइनसाठी संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित एनिमलया चित्रपटाची निवड करण्यात आली.