जेम्स कॅमेरॉन - कॅनेडियन चित्रपट निर्माते

जेम्स कॅमेरॉन हे कॅनेडियन चित्रपट निर्माते आहेत. जेम्स यांनी टायटॅनिक सारख्या प्रसिद् चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जेम्स कॅमेरॉन यांनी अवतार हा चित्रपट प्रदर्शित केला, अवतारला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट वैज्ञानिक कथा, कादंबऱ्यांवर आधारित आहे.

अवतार एक वैज्ञानिक चित्रपट

अवतार २००९ साली प्रदर्शित झाला. हा एक चित्रपट नाही तर या चित्रपटाची सिरीझ देखिल काढली गेली. १८०० कोटी खर्च करून बनवलेल्या अवतारने जगभरात २०,३६८ कोटींची कमाई केली.

दुसऱ्या भागाचा बजेट काय?

अवतार : द व्हे आॅफ वाॅटर या दुसऱ्या भागाचा बजेट ७५०० कोटी होता मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जगभरात १७,५८७ कोटिंची कमाई केली.

अवतारचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार!

अवतार चित्रपटाचे २ दोन भाग प्रेक्षकांना खूप आवडले. तिसरा भाग १९ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित करणार आहेत. तिसऱ्या भागाचे नाव हे अवतार: आग आणि राख असे आहे. तिसऱ्या भागाचे बजेट २१५६ कोटी आहे. तिसऱ्या भागाचा ट्रेलर सुद्धा रिलीस झाला आहे.