योग केल्यामुळे आजार कमी होतात का?

हो, योग केल्यामुळे आजार कमी होण्याची शक्यात तर आहेच मात्र योग रोज नियमित केल्याने त्याचे फायदे दिसून येतात.

योगमुळे मधुमेह कमी होतो का?

दिल्लीतील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेसमधील एंडोक्राइनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एस.व्ही. मधू यांच्या नेतृत्वाखाली असा अभ्यास करण्यात आला आहे की नियमितपणे योगभ्यास केल्याने टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींमध्ये ४०% पर्यंत कमी होऊ शकते. 'योगा आणि टाइप २ मधुमेह प्रतिबंध' हा नवीन अहवाल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री जेपी नड्डा यांना सादर करण्यात आला आहे.

टाइप २ मधुमेह काय आहे?

टाइप २ मधुमेह ही अशी स्थिती आहे जिथे शरीर पुरेसे इन्सुलिन नावाचे हार्मोन्स तयार करू शकत नाही किंवा ते बनवणारे इन्सुलिन योग्यरित्या काम करत नाही. इन्सुलिन ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यासाठी जबाबदार असते. जेव्हा हार्मोन्सची कमतरता किंवा बिघाड होते तेव्हा रक्तप्रवाहात ग्लुकोजची पातळी जास्त होते.

फायदेशीर असलेल्या काही योगासनांचाही शोध!

नवीन अभ्यासात मधुमेह रोखण्यासाठी फायदेशीर असलेल्या काही योगासनांचाही शोध घेण्यात आला आहे. या अभ्यासात केवळ अशा लोकांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे ज्यांना हा आजार होण्याचा धोका आहे आणि तो सुरू झाल्यास तो पूर्णपणे रोखता येतो का.