६,००० रुपयांचं अंडं व्हायरल का होतंय?

सध्या सोशल मीडियावर ही रंगीबेरंगी अंडी फार व्हायरल होताना दिसत आहेत, मात्र ही कोणत्या प्रकारची अंडी आहेत हे कोणाला माहीत नाही. या अंड्यांचा इतिहास काय?

अंडी सजवण्याची परंपरा

या अंड्यांना क्रोएशिया येथे ‘पिसानिका’, तर पोलंड येथे ‘पिसांका’ असे म्हणतात. क्रोएशिया, पोलंड, युक्रेन या देशांमध्ये ही अंडी सजवण्याची परंपरा आहे. समकालीन पोलान्त भाषेत ‘पिसांका’ याचा अर्थ फक्त ‘लिहिणे’ असा होतो, मात्र जुन्या पोलिश भाषेत त्याचा अर्थ ‘रंगवणे’ असाही होतो.

या अंड्यांचे प्रकारसुद्धा आहेत

ही अंडी वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि प्रकारांमध्ये सजवली जातात. अगदी सावधानपूर्वक काम केले जाते. ’किस्तका’ या उपकरणाचा वापर करून मेण वितळवून चित्र काढले जाते. अंड्याचा पृष्ठभाग आणि चित्र वेगवेगळ्या रंगात असल्याने अधिक उठून दिसते.

ईस्टर संडेला या अंड्यांचं काय केलं जातं?

पोलंडमध्ये ईस्टर संडेला, पारंपरिक ईस्टर बास्केटसह अंडी पवित्र करून सजवली जातात. नाश्त्यापूर्वी ही अंडी टेबलावर ठेवून सर्व कुटुंबाला वाटली जातात. हे एक मैत्रीचे प्रतीक आहे, जसे नाताळच्या पूर्वसंध्येला ‘ओपलेटेक’ (ख्रिसमस वेफर) शेअर केले जातात.

‘पायसँकी’ अंड्यांचे सांस्कृतिक महत्त्व

‘पायसँकी’ हे युक्रेनियन संस्कृतीत खोलवर रूजलेले आहे आणि त्यांना जीवन, पुनर्जन्म आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.

‘क्राशंक लढाई’चा समावेश

युक्रेनमध्ये ‘पायसँकी’ला ‘क्राशांकी’ असे म्हटले जाते. तेथील मुले ईस्टरला ‘क्राशंक लढाई’सारखे विविध खेळ ‘पायसँकी’ने खेळतात. यात खेळाडू एकेक करून एकामेकांवर अंडी फेकतात. ज्याचे अंडे फुटते तो हरतो आणि ज्याचे फुटत नाही तो विजेता ठरतो.