माधवी भाभी म्हणून ओळखली जाणारी सोनालिका जोशी

17 वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत माधवी भाभी म्हणून ओळखली जाणारी सोनालिका जोशी एका फोटोशूटमुळे चर्चेत आली, असे तिने सांगितले

एका फोटोशूटमुळे ‘चेन स्मोकर’ असल्याचे गृहीत धरले!

एका मुलाखतीत सोनालिकाच्या एका फोटोशूटमुळे तिला ‘चेन स्मोकर’ म्हणून लोकांनी गृहीत धरले. मात्र हा फक्त एक फोटोशूट होता, ज्यामध्ये कॅमेर्‍यासमोर सिगारेट हातात घेऊन पोझ द्यावी लागली, असे तिने मुलाखतीत सांगितले

मी धूम्रपानही करत नव्हते

मी धूम्रपानही करत नव्हते, फक्त सिगारेट धरून बसले होते. कारण, मला ती सिगारेट स्टाईल आणि पोझसाठी दिली होती. काही दिवसांनंतर युट्यूबवरती तो फोटो पाहून लोकांनी मला ‘चेन स्मोकर’ असल्याचे गृहीत धरले, असं सोनालिका म्हणाली

शांत राहण्याचा निर्णय घेतला कारण...

सोनालिकाने त्यावेळी शांत राहण्याचा निर्णय घेतला, कारण तिला अनावश्यक अफवांवर भाष्य करायचे नव्हते. ती पुढे म्हणाली, त्यांना बोलू द्या. माझे कुटुंबच माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे; माझी सर्वांत मोठी संपत्ती आहे. जर घरच्यांना माहीत असेल की मी कशी आहे, तर लोक जे छापतात, त्यामुळे काय फरक पडतो?

ते एक योग्य फोटोशूट होते

ते एक योग्य फोटोशूट होते. लूक पूर्णपणे वेगळा होता. मी एखाद्या गटासोबत धूम्रपान करत नव्हते. जर त्यांना ते समजत नसेल, तर त्यांना बोलू द्या. कदाचित त्यांनी युट्यूूबवर व्ह्यूज मिळवण्यासाठी मला गृहीत धरले असेल, असे सोनालिकाचे तिच्याबद्दल होणार्‍या चर्चेविषयी मत आहे