जगात आपल्या स्टाईलमुळे ओळखल्या जाणार्या सुपरस्टार शाहरुख खानला चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दुखापत झाली आहे
शाहरुख खान हा सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ’किंग’ या चित्रपटात सर्वांना लवकरच दिसणार आहे. सोबतच शाहरुखची मुलगी सुहाना खानही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची अशी माहिती समोर आली आहे
एक फायटिंग सिन शूट करत असताना शाहरुखला दुखापत झाली. या दुखापतीमुळे चित्रपटातील कर्मचार्यांमध्ये घबराट पसरली होती
शाहरुख वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला गेला आहे. शुटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी महिनाभराची सुटी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे
जुलै ते ऑगस्टदरम्यान चित्रपटाच्या शुटिंगची योजना रद्द करण्यात आली आहे. आता सप्टेंबरनंतर वर्षाच्या दुसर्या सहामाहीत शुटिंग सुरू होण्याची अपेक्षा आहे