जपानने नवीन प्रयोग काय केला?

नवीन प्रयोग करण्यात मागे नसणाऱ्या जपानने हा काहीतरी आगळा वेगळा प्रयोग करून पाहिला आहे चक्क लाल रक्ताऐवजी जांभळ्या रक्ताची निर्मिती करण्यात आली आहे

कृत्रिम रक्ताचा प्रयोग का केला?

जेव्हा शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाला रक्ताची गरज भासते, तेव्हा हे कृत्रिम रक्त उपयोगी पडेल असे जपानचे म्हणणे आहे

जपानमधील ‘या’ प्रोफेसरने विकसित केले जांभळे रक्त!

जपानमधील नारा मेडिकल युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर हिरोमी सकाई आणि त्यांच्या टीमने हे कृत्रिम रक्त विकसित केले आहे

जगात दरवर्षी ११२ दशलक्ष युनिट्स रक्तदान केले जाते

जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) अंदाज आहे की जगभरात दरवर्षी ११२ दशलक्ष युनिट्स रक्त दान केले जाते, तरीही मागणी अजूनही पुरवठ्यापेक्षा खूपच जास्त आहे, यामुळे जपानने कृत्रिम रक्त विकसित केले

हिमोग्लोबिन वेलिक्लस म्हणून ओळखले जाते

जपानने कृत्रिम रक्त विकसित केले आणि त्याला हिमोग्लोबिन वेलिक्लस म्हणून ही ओळखले जाते

जांभळे रक्त लाल रक्तासारखे काम करणार का?

जपानचे असे म्हणणे आहे की मानवी शरीरात लाल रंगाचे रक्त जसे काम करते तसेच जांभळ्या रंगाचेही रक्त काम करणार आहे