जगप्रसिद्ध ‘अ‍ॅनाबेल’ बाहुलीमुळे मृत्यू!

जगप्रसिद्ध असलेल्या ‘अ‍ॅन अ‍ॅनाबेल बाहुली’मुळे प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर डॅन रिवेराचा मृत्यू झाल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे

प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर डॅन रिवेराचा रहस्यम्य मृत्यू

५४ वर्षीय रिवेरा पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आणि ‘न्यू इंग्लंड सोसायटी फॉर सायकिक रिसर्च’ (NESPR)चे वरिष्ठ प्रमुख इन्व्हेस्टिगेटर होते. डॅन रिवेरा यांचे रहस्यमय मृत्यू झाले आहे. मात्र, हा मृत्यू ‘अ‍ॅन अ‍ॅनाबेल बाहुली’मुळे झाला, असा लोकांचा समज आहे

प्रवासात नक्की काय झाले?

दि. १३ जुलैच्या रात्री रिवेरा हे ‘डेव्हिल्स ऑन द रन’ या टूरचा भाग होते, ज्यामध्ये जगप्रसिद्ध रॅगेडी ‘अ‍ॅन अ‍ॅनाबेल बाहुली’ प्रदर्शित केली जाणार होती. मात्र, रात्री डॅन रिवेरा यांनी ही बाहुली त्यांच्यासोबत प्रवासात नेली आणि थोड्याच वेळाने त्यांचा या प्रवासात मृत्यू झाल्याचे समजले

भूतग्रस्त अ‍ॅनाबेल बाहुली!

डॅन रिवेराच्या मृत्यूनंतर काही लोकांनी म्हटले की, हा मृत्यू ‘भूतग्रस्त अ‍ॅनाबेल बाहुली’मुळे झाला आहे. मात्र, अधिकार्‍यांनी त्याबद्दल काहीही संशय वर्तवला नाही

अ‍ॅनाबेल बाहुली ही भेट देण्यात आली!

अ‍ॅनाबेल बाहुली ही रॅगेडी ‘अ‍ॅन अ‍ॅनाबेल बाहुली’ आहे, जी 1968 मध्ये एका विद्यार्थ्याला भेट देण्यात आली होती. असे म्हटले जाते की, ज्या विद्यार्थ्याला ही बाहुली भेट देण्यात आली होती, त्याच्याभोवती लवकरच विचित्र घटना घडू लागल्या