वुलर सरोवर हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक आहे
वुलर सरोवराच्या काठावर अब्दुल रशीद दार आश्चर्याने कमळाला नाजूकपणे स्पर्श करत म्हणाले लहान असताना, मी माझ्या वडिलांसोबत कमळाच्या फांद्या कापण्यासाठी जायचो पण ते खूप पूर्वीचे होते मला वाटले की आपण देवाची ही देणगी कायमची गमावली आहे कारण तब्बल ३० वर्षानंतर वुलर सरोवरमध्ये कमळ पुन्हा पहायला मिळाले आहे
वुलरमध्ये ३० वर्षांपुर्वी एका पुरामुळे या सरोवराच्या भागातून कमळ पूर्णपणे नष्ट झाले मात्र आता पुन्हा कमळाचे फूल उमलताना दिसत आहेत
पुरामुळे साचलेला गाळ हा वुलर संवर्धन आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संवर्धन प्रयत्नांमुळे गाळ काढण्यात आला कमळाचे बियाणे गाळ आणि मातीत खोलवर गाडले गेले असल्याने ते वाढू शकले नाही गाळ काढल्यांनंतर पुन्हा कमळाचे पुनरुज्जीवन झाले
कमळची मुळ ही नाद्रू म्हणून ओळखले जाते हे देठ काश्मीरमध्ये एक स्वादिष्ट पदार्थ आहे, मासे किंवा दह्यासोबत शिजवून नाद्रू याखनी सारखे पदार्थ बनवले जातात