देवशयनी आषाढी एकादशी, ज्याला आषाढी एकादशी असेही म्हणतात भगवान विष्णूंच्या चार महिन्यांच्या झोपेची सुरुवात आहे ज्याला चातुर्मास म्हणतात कारण या दिवशी भक्त आशीर्वाद आणि आध्यात्मिक शुद्धीकरण मिळविण्यासाठी उपवास, प्रार्थना आणि विविध विधी करतात आणि हा दिवस पाळतात
महाराष्ट्रात आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या यात्रेसाठी विशेष महत्त्व आहे कारण विठ्ठलाचे भक्त वारकरी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांसारख्या संतांच्या पालख्या घेऊन शेकडो किलोमीटर पायी चालत आषाढी एकादशीला पंढरपूरात पोहोचतात सर्व वारकरी स्मप्रदाय ब्रमहनाद, भजन गात आपली वारी पूर्ण करतात
दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक विठ्ठलाचे नाव घेत पायी चालत पंढरपुरात येतात
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरनगरी खुप सुंदर सजवली जाते
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखी आषाढी एकादशीचा मुख्य दिवशी पंढरपूरात पोहोचतात