मुंबईच्या वडापावची गोष्ट...

दादर रेल्वे स्थानकाजवळील विक्रेते अशोक वैद्य यांनी वडापाव विकण्याची सुरूवात १९६०च्या दशकात केली

गिरणी कामगारांसाठी वडापावचा शोध!

वैद्य यांनी शहरातील गिरणी कामगारांसाठी परवडणारा आणि पोटभर नाश्ता म्हणून वडापाव तयार केला

वडापावची किंमत वाढली की नाही?

वडापावची किंमत दिवसेंदिवस वाडत आहे काही ठिकाणी चक्क पंचवीस रूपयांना वडापाव मिळतो फक्त रेल्वे स्थानकावर किंमत कमी होती मात्र आता रेल्वे स्थानकानवर मिळणारा वडापाव आता अठरा रूपयांनी विकला जाणार आहे

मुंबईच्या संस्कृतीत खोलवर रुजला आहे

वडापाव हा मुंबईच्या संस्कृतीत खोलवर रुजला आहे, जो शहराच्या वेगवान जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करतो

इंडियन बर्गर म्हणून ओळख!

मुंबईबाहेरील लोकांसाठी लोकप्रिय स्ट्रीट फूडला ओळख देण्यासाठी इंडियन बर्गर म्हणून वडापावला नाव देण्यात आले