२० रूपयांमध्ये वैद्यकीय उपचार करणारे डाॅ.दावर यांचे निधन

लोकांना कमीत कमी ₹२० मध्ये वैद्यकीय उपचार देण्यासाठी प्रसिद्ध असलेले मध्य प्रदेशचे ७७ वर्षीय डॉ. एम सी दावर यांचे निधन झाले

२ रुपयां पासून सुरू केला वैद्यकीय व्यवसाय

जबलपूरमध्ये रहाणारे डाॅ. दावर यांनी फक्त २ रूपयां पासून वैद्यकीय उपचार देण्यास सुरूवात केली पुढे ५ मग १० शेवटी फक्त २० रूपयांमध्ये लोकांचे उपचार करण्याचे ठरवले

शेजारच्या गावातील लोकही उपचार घेण्यासाठी येतात

शेजारच्या गावातील लोकही डॉ. दावर यांच्याकडे उपचार घेण्यासाठी जबलपूरला येतात

सामाजिक कार्यासाठी पद्मश्री देण्यात आले

डाॅ. दावर यांना २०२० साली त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले

भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सैनिकांवर उपचार केले!

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सैनिकांवर उपचार केले पण नंतर सामान्य लोकांची सेवा करण्यासाठी मी स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, असे डॉ. दावर एका मुलाखतीत म्हणाले