पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत, घाना, त्रिनिदाद, टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांना पंतप्रधान भेट देणार आहेत
राजधानी अक्रा येथे एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्राध्यक्ष महामा यांनी पंतप्रधान मोदी यांचा घानाच्या 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान केला
भारत नेहमीच घानाच्या जनतेसोबत उभा राहील आणि एक विश्वासू मित्र आणि विकास भागीदार म्हणून योगदान देत राहील असे पंतप्रधान मोदी म्हणाले
हा सन्मान तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या आकांक्षा, आपली समृद्ध सांस्कृतिक विविधता आणि भारत-घाना यांच्यातील ऐतिहासिक संबंधांना पंतप्रधानांनी हा पुरस्कार समर्पित केला
'ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' हा पुरस्कार दिल्याबद्दल घानाच्या जनतेचे आणि सरकारचे मोदिंनी आभार मानले