अमरनाथ यात्रा ही एक धार्मिक यात्रा आहे जी तुमच्या श्रद्धेची, आरोग्याची आणि संयमाची परीक्षा घेते
दरवर्षी, देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो यात्रेकरू जम्मू आणि काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेत दर्शनास येतात
ही गुहा १२,७०० फूट उंचीवर आहे आणि त्यात नैसर्गिकरित्या तयार झालेले बर्फाचे शिवलिंग आहे जे साक्षात महादेवांचे प्रतिनिधित्व करते
अमरनाथ यात्रा ही केवळ एका ट्रेकपेक्षा जास्त आहे ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने यात्रेकरी येतात
अमरनाथला जाण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत एक म्हणजे पहलगाम मार्ग आणि एक बालटाल मार्ग
ही यात्रा ३ जुलै ते ९ ऑगस्ट २०२५ होणार आहे
अमरनाथ यात्रेला १३ ते ७० वयोगटातील लोकांना येण्याची अनुमती आहे